ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

Coronavirus testing expands for asymptomatic use.

जगभरात धुमाकूळ घालणारा ओमिक्रोन भारतात दाखल झाला असून कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. आता या दोन ओमिक्रोन पेशंट पैकी एकाच्या संपर्कातले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रासह देश अलर्टवर आहे. बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रोनचे रुग्ण सापडलेत, त्यातल्या एकाने कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रोनची लागण कुठून झाली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्नाटकमध्ये रुग्ण सापडू लागल्याने महाराष्ट्रामध्ये चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून म्हणजेच कर्नाटकमधून महाराष्ट्रात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये- जा सुरू असते. कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सापडलेले हे दोन्ही ओमिक्रोनचे रुग्ण असून त्यातील एक जण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असून त्याचे वय ६६ वर्षे इतके आहे. गेल्या महिन्यात तो दुबई मार्गे बंगळुरुमध्ये आला आहे तर, दुसरा रुग्ण हा एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये काम करणारा ४६ वर्षीय डॉक्टर आहे. डॉक्टरने कुठेही प्रवास केलेला नाही आणि त्यामुळेच त्याला ओमिक्रोनची लागण कशी झाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

परमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही

आम्ही सतर्क आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी यासंबंधी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून पुढील तपशील लवकरच प्राप्त होणार आहे. आता रुग्णांना शोधणे, त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधणे ही आमची जबाबदारी आहे. विदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना आम्ही शोधण्यास सुरुवात केली असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version