कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली माहिती

कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!

कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी समोर आली आहे.मादी ‘गामिनी चित्त्या’ने पाच शावकांना जन्म दिला आहे.केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर सांगितले की, भारतात जन्मलेल्या शावकांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी गामिनीच्या शावकांना व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.केंद्रीय मंत्री यांनी ट्विट करत लिहिले की, हाय फाईव्ह, कुनो! दक्षिण आफ्रिकेतुन आणलेल्या ५ वर्षांच्या मादी गामिनी चित्ताने आज (१० मार्च ) ५ शावकांना जन्म दिला आहे.यामुळे भारतात जन्मलेल्या शावकांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

हे ही वाचा:

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

युसुफ पठाण तृणमूलमधून लढणार लोकसभा!

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढे म्हणाले की, सर्वांचे, विशेषत: वन अधिकारी, पशुवैद्यकीय आणि क्षेत्रीय कर्मचारी यांच्या टीमचे अभिनंदन ज्यांनी चित्त्यांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण केले.यामुळे चित्ते यशस्वीरीत्या वेवस्थित राहू शकले आणि शावकांचा जन्म झाला.आता कुनो नॅशनल पार्कमधील शावकांसह एकूण चित्त्यांची संख्या २६ झाली आहे.गामिनीचा वारसा आता पुढे सरकत आहे, असे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करत लिहिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ‘प्रोजेक्ट चित्त्याला’ यश मिळताना दिसत आहे.मागील काही महिन्यांपूर्वी चित्ते मरण पावले होते.मात्र, आता त्या संख्येत भर पडताना दिसत आहे.

Exit mobile version