29 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
घरविशेषलोणावळ्यातील भुशी डॅमजवळ पाच जण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ पाच जण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

पावसात काळजी घेण्याचे आवाहन

Google News Follow

Related

पावसाळ्याच्या दिवसांत धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक विविध ठिकाणांहून येत असतात. मात्र अतिसाहस करण्याच्या नादात काही लोकांना जीव गमवावा लागतो. तसाच प्रकार या अन्सारी कुटुंबाच्या बाबतीत घडला. पाच जण वाहून गेले त्यातील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

भुशी डॅमच्या मागे असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब गेले होते. पुण्यातील सय्यदनगर भागात हे तिघे राहात होते. त्यात चार मुलांसह एका महिलेचा समावेश होता. यासंदर्भातील व्हीडिओ समोर आला असून हे पाचही जण पाण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि मग या सगळ्यांना तिथे उभे राहणे शक्य होत नव्हते. सगळ्यांनी एकमेकांना पकडले होते पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि ते वाहून गेले.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय; दिल्लीत चार मुलांसह सहा जण बुडाले

पंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’

आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?

इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

त्यांना वाचविण्याचे प्रयत्नही किनाऱ्यावर उभे असलेले लोक करत होते, पण त्यांनाही त्यात यश आले नाही. नंतर स्थानिक प्रशासनाने शोधकार्य हाती घेतले तेव्हा तिघांचे मृतदेह हाती आले आहेत. शिवाय, स्थानिक शिवदुर्ग मित्र मंडळ व शहर पोलिसांच्या मदतीने शोधमोहिम घेतली गेली. बाकी सदस्यांचा शोध जारी आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

यानिमित्ताने पुन्हा एकदा अतिसाहस करणाऱ्यांचा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. धबधबे, नद्या, पाण्याचे प्रवाह याठिकाणी पावसात आनंद लुटण्यासाठी अनेक लोक जात असतात पण त्यांनी अतिसाहस करू नये, अन्यथा त्याचा फटका बसतो असा सल्ला वारंवार दिला जात असतो तरीही अनेक लोक तो सल्ला मानत नाहीत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा