नवी मुंबई अग्निशमन दलात आता फायर बाईक दाखल झाल्या आहेत. आगीच्या घटनास्थळी जिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यास विलंब होतो किंवा जिथे त्या पोहचू शकत नाहीत अशा ठिकाणी या फायर बाईक मदतीसाठी पोहचणार आहेत. अत्याधुनिक पाच फायर बाईक नवी मुंबई अग्निशमन दलात दाखल झाल्या असून प्रत्येक अग्निशमन दलाच्या केंद्रावर एक बाईक देण्यात आली आहे. अडचणीच्यास्थळी या बाईक प्रथम पोहचून आग विझवण्यासाठी प्राथमिक प्रयत्न करू शकणार आहेत.
नवी मुंबई अग्निशमन दलात अत्याधुनिक फायर इंजिन, फायर लिफ्ट, फायर टेंडर आहेत. उंच इमारतींना लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी उंच फायर लिफ्ट असणाऱ्या गाड्याही नवी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत. तसेच पाण्यात शोध घेण्यासाठी अत्याधुनिक असा अंडर वॉटर सर्च कॅमेराही अग्निशमन दलाकडे आहे. आता या अत्याधुनिक फायर बाईक खरेदी करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
भारत बंद म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार
‘भारताला आणखी चार-पाच स्टेट बँक हव्यात’
वाझे म्हणतो, मला घरीच नजरकैदेत ठेवा!
आता आरटीओत न जाताच या संस्थांकडून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स
या एका फायर बाईकची किंमत १३ लाख आहे. बाईकच्या दोन्ही बाजूस २० लिटर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. या टाक्यांमधून पाण्याचा मारा करण्यासाठी पाईप बसवण्यात आले आहेत. नामांकित कंपनीच्या या फायर बाईक असून वजन पेलू शकतील अशी त्यांची बनावट आहे. बऱ्याचदा वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचण्यास उशीर होतो. आशा वेळी या फायर बाईक घटनास्थळी लवकर पोहचून आग विझवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.