26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषट्रक- कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

ट्रक- कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

पुणे- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Google News Follow

Related

पुणे- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि कारचा अपघात झाला असून कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. गाडीमधले लोक पनवेलला जाण्यासाठी निघाले होते अशी माहिती आहे.

रांजणगाव एमआयडीसी येथील एलजी कंपनीसमोरून एक मोठा कंटेनर उलट दिशेने येत होता. त्याचवेळी एक ईको कार नगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी कार आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मृत्यू झालेले सर्व एकाच कुटुंबातील असून हे कुटुंब नगरमधील लग्नकार्य आटपून पुन्हा पनवेलकडे निघाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश होता. या लहान मुलांचे वय १४ वर्षे, ७ वर्षे आणि ४ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला

गोविंदाना १० लाखांचे विमा कवच

विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

दरम्यान, या अपघातानंतर संबंधित ट्रक चालक आणि त्याच्या सोबतच्या हेल्परने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. तर कंटेनर चालकाचा आणि हेल्परचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा