पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात काही दिवसांपूर्वी एका २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अशातच या घटनास्थळाला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र प्रवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भेट देत परिसराची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर टीका करत निशाणा साधला आहे.
“बोपदेव घाटात घडलेल्या संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून १२ टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी? आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे ,पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? झोपी गेलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे,” अशी पोस्ट करत रूपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
संबंधित घटना घडून पाच दिवस झाले,पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले,मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून १२ टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत.मग आपला हा देखावा कशासाठी???
आपल्या माहितीसाठी,चंद्रपुरमध्ये कोरपना येथे १२… https://t.co/xA9oCFMdhk pic.twitter.com/GybFSRQ7bl— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 9, 2024
हे ही वाचा..
स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई
ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल
हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार
मुंबईतील वृद्धेची १.३० कोटीची फसवणूक
पुण्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित तरुणी आपल्या मित्रांसह पुण्यातील कोंढवा येथील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेखां करीम पठाण आपल्या दोन मित्रांसह तेथे आला आणि मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत, याठिकाणी फिरणे हे बेकायदेशीर असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावत त्यांचे फोटो काढत तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि घाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या येवलेवाडीमध्ये नेण्यात आली. याठिकाणी तरुणीवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तरुणीला सोडून आरोपी पळून गेले.