26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष...म्हणून एका वर्षात पाच कोटींहून अधिक मनरेगा जॉब कार्डे रद्द

…म्हणून एका वर्षात पाच कोटींहून अधिक मनरेगा जॉब कार्डे रद्द

बोगस, डुप्लिकेट जॉब कार्ड; काम करण्याची इच्छा नसणे आदि कारणांमुळे कार्डे रद्द

Google News Follow

Related

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत पाच कोटींहून अधिक जॉब कार्डे रद्द करण्यात आली आहेत. हे प्रमाण सन २०२१-२२च्या तुलनेत २४७ टक्क्यांहून अधिक आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बोगस, डुप्लिकेट जॉब कार्ड; काम करण्याची इच्छा नसणे; कुटुंबाचे ग्रामपंचायतीमधून कामयस्वरूपी स्थलांतरण होणे किंवा मृत्यू झाल्यामुळे ही नावे रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एक कोटी ४९ लाख ५१ हजार २४७ श्रमिकांची मनरेगा जॉब कार्डे रद्द करण्यात आली होती. तर, सन २०२२-२३मध्ये हीच संख्या पाच कोटी १८ लाख ९१ हजार १६८ होती. सर्वांत अधिक कार्डे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून रद्द झाली आहेत.

२०२१-२२मध्ये प. बंगालमधून एक लाख ५७ हजार ३०९ कार्डे रद्द झाली होती. तर, २०२२-२३मध्ये ८३ लाख ३६ हजार ११५ जॉब कार्डे रद्द करण्यात आली. आंध्र प्रदेशात २०२१-२२मध्ये सहा लाख २५ हजार ५१४ तर, सन २०२२-२३मध्ये ७८ लाख पाच हजार ५६९ कार्डे रद्द करण्यात आली. तेलंगणात सन २०२१-२२मध्ये ६१ हजार २७८ तर, सन २०२२-२३मध्ये १७ लाख ३२ हजार ९३६ कार्डे रद्द करण्यात आली. गुजरामध्ये सन २०२१-२२मध्ये एक लाख ४३ हजार २०२ तर, सन २०२२-२३मध्ये चार लाख ३०हजार ४०४ कार्डे रद्द करण्यात आली.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला अंतिम विजेतेपद

कारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!

अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!

पंतप्रधान शेतकरी योजनेचे ८ कोटी ११ लाख लाभार्थी

मार्च २०२३पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची संख्या आठ कोटी ११ लाखांपर्यंत पोहोचली आहे. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९पर्यंत या योजनेचे पहिल्या टप्प्यात तीन कोटी १६ लाख लाभार्थी होते. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांन मंगळवारी लेखी उत्तरात ही माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थींना वर्षभरात तीन टप्प्यांत सहा हजार रुपये दिले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा