भारतात शिरकाव करणाऱ्या पाच बांगलादेशींना माघारी धाडले!

मुख्यमंत्र्यांनी आसाम पोलिसांचे केले कौतुक

भारतात शिरकाव करणाऱ्या पाच बांगलादेशींना माघारी धाडले!

बेकादेशीरपणे शिरकाव करून भारतात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. घुसखोरीचे हे जाळे मोठे असून अशामध्ये भारतीय एजंटचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशा घुसखोरांचा मतदानासाठी वापर केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पोलीस अशांवर नजर ठेवून आहेत. सीमा सुरक्षा दल देखील चोख कामगिरी बजावत आहेत. अशातच आसाममधून ताजी घटना समोर आली आहे. बेकादेशीरपणे भारतात शिरकाव करणाऱ्या पाच बांगलादेशींना सुरक्षा दलाने पुन्हा माघारी पाठवले आहे.

घुसाखोरांमध्ये पाच जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये चार पुरुष आणि एका महिला आहे. आसाम पोलिसांनी घुसखोरांना पकडून पुन्हा माघारी पाठवले. दुडू मिया चकदार, अनुवर हुसेन, इम्रान हसन, एमडी महबूब, नहर बेगम, अशी घुसखोरांची नावे आहेत. आसाम पोलिसांनी ट्वीटकरत याची माहिती दिली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसाम पोलिसांची पोस्ट रीपोस्टकरून आसाम पोलिसांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री हिमंता सरमा ट्वीटकरत म्हणाले, भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता दाखवत, आसाम पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ५ बेकायदेशीर बांगलादेशींना पकडले आणि त्यांना सीमेपलीकडे ढकलले. टीमचे अभिनंदन, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले. दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये अशा घुसखोरांवर कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : 

गोंदिया- कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!

शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

 

पावशेर, शेर आणि शेरनी ! Mahesh Vichare | Sanjay Raut | Priyanka Gandhi Vadra

Exit mobile version