गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची नौदलाच्या पाणबुडीशी टक्कर

११ क्रू मेम्बर्सला वाचवण्यात यश; दोन जणांचा शोध सुरू

गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची नौदलाच्या पाणबुडीशी टक्कर

गोवा राज्याच्या किनारपट्टी भागात मासेमारी जहाज आणि भारतीय नौदलाच्या पाणबुडीची टक्कर झाल्याची घटना घडली. जहाजावरील ११ जणांना वाचवण्यात यश आले असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर, जहाजावरील लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.

गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोव्याच्या किनारपट्टीपासून ७० नॉटिकल मैल अंतरावर ‘मार्थोमा’ नावाच्या मासेमारी जहाजाची भारतीय नौदलाच्या पाणबुडीशी टक्कर झाली. भारतीय नौदलाने याची माहिती दिली असून एएनआयने याचे वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टक्कर झाली तेव्हा ‘मार्थोमा’ या मच्छीमारी जहाजावर १३ क्रू मेंबर्स उपस्थित होते. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा:

निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी केले स्पष्ट

कॅनडाने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींना निज्जरच्या हत्येचा कट माहित असल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताचे केले खंडन

कॅनडाने सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानंतर दोन कॉन्सुलर कॅम्प रद्द

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ‘गंभीर’; राजधानीत दाट धुक्याची चादर

घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ शोध आणि बचाव कार्य सुरू केले आणि आतापर्यंत ११ क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. शोध घेण्यासाठी सहा जहाजे आणि अनेक विमाने प्रभावित भागात तैनात करण्यात आली आहेत. मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राच्या (MRCC) समन्वयाने बचाव कार्य आणि शोध मोहीम सुरू आहे. भारतीय नौदलाने शोध मोहिमेसाठी अतिरिक्त यंत्रणा देखील या भागात वळवली आहे.

Exit mobile version