दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना, चक्री वादळे अशा संकटांना तोंड देताना आर्थिक घडी विस्कटलेली असताना मच्छिमार चंद्रकांत तरे हे एका दिवसात कोट्याधीश झाले आहेत.
पालघर तालुक्यातील मुरबे या मासेमारी गावातील चंद्रकांत तरे यांच्या बोटीला मासेमारी करत असताना मोठ्या प्रमाणात घोळ मासे हाती लागले. मुंबईतील व्यापाऱ्यांनी १ कोटी ४० लाखांहून अधिक किंमतीला हे मासे खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणाच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात १५७ घोळ मासे सापडले. मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्यांचे आठ सहकारी २८ ऑगस्टला आपल्या बोटीसह मासेमारीसाठी रवाना झाले होते. डहाणू- वाढवणच्या समोर समुद्रात साधारणपणे २० ते २५ नॉटिकल समुद्रात जाळे टाकण्यात आले. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर मच्छिमारांनी जाळे बोटीत घेण्यास सुरुवात केली. सुमारे १२ ते २५ किलो वजनाचे घोळ मासे सापडल्याने मच्छिमार आनंदात होते.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
तब्बल २३ वर्षांनी पाकिस्तानातून तो परतला आणि…
घोळ माशाच्या पोटातील भोत याला बाजारात मोठी किंमत असून नर जातीच्या भोताला तुलनेने अधिक दर असतो. लिलावाद्वारे या भोताची खरेदी केली जाते. सर्वात जास्त बोली लावणाऱ्या आणि पैशाची हमी देणाऱ्या व्यापाराला याची विक्री केली जाते. मुरबे येथे १५ ते २० व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव झाला असून त्यावेळी १ कोटी ३२ लाख ५० हजारांची उच्चतम बोली लावण्यात आली. घोळ माशाचे मास ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केले. त्यातून आठ हजारांहून अधिक रक्कम असे एकूण १ कोटी ४० लाख रुपये मिळाल्याचे समजते.
घोळ माशांमधील हे भोत खरेदी केल्यानंतर खूपच सावधानतेने आणि नाजूकरित्या त्याच्या स्वच्छतेची प्रक्रिया केली जाते. मलेशिया, थायलंड, हाँगकाँग आदी देशात या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारा धागा यासाठी याचा वापर करण्यात येतो.