रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणारे राहुल गांधी यांना सोशल मीडियावर सर्वसाधारणपणे भाजप समर्थकांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र शुक्रवारी माजी बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कॅस्परोव्ह यांनीही त्यांना गमतीजमतीत ट्रोल केले. कॅस्परोव्ह यांनी सोशल मीडियावर लिहिले की, परंपरावादी म्हणतात की, सर्वोच्च स्थानासाठी आव्हान देण्याआधी पहिल्यांदा तुम्हाला रायबरेलीतून जिंकावे लागेल. सर्वोच्च स्थान म्हणजे नरेंद्र मोदी असे कॅस्परोव्ह यांना सांगायचे होते.
राहुल गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी देणे ही राजकारणाच्या बुद्धिबळातील चाल आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केले होते. तर, काँग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान स्वतःच्या मोबाइलवर बुद्धिबळ खेळणाऱ्या राहुल गांधी यांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत गांधी यांनी कॅस्परॉव्ह हे आपले पसंतीचे बुद्धिबळपटू होते असे सांगत खेळ आणि राजकारणातील समान बाबीही विशद केल्या. तसेच, राजकीय नेत्यांमध्ये आपण सर्वांत उत्तम बुद्धिबळपटू आहोत, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
हे ही वाचा:
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!
पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!
त्यावर पत्रकार-लेखक संदीप घोष यांनी सोशल मीडियावर गांधींवर टीका कली. ‘बरे झाले, कॅस्परॉव्ह व विश्वनाथन आनंद लवकर निवृत्त झाले आणि त्यांना आपल्या वेळी महान बुद्धिबळपटूचा सामना करण्याची वेळ आली नाही,’ असे लिहिले. घोष यांनी या ट्वीटमध्ये कॅस्परॉव्ह व आनंद यांनाही टॅग केले. यालाच कॅस्परॉव्ह यांनी प्रत्युत्तर दिले.