देशातील पहिला टोलनाका मुक्त महामार्ग कार्यान्वित

देशातील पहिला टोलनाका मुक्त महामार्ग कार्यान्वित

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाका मुक्त हायवे निर्माण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गडकरींनी देशातील पहिला टोलनाका मुक्त हायवे निर्माण केला आहे. या हायवेवर गाडीने कापलेल्या अंतरानुसार टोल कापला जाणार आहे.

दिल्ली-मेरठ या महामार्गावरील टोलचे दर अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे वाहने सध्या कोणताही टोल न भरता जात आहेत. परंतू या महामार्गावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टमद्वारे टोल कापण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दर निश्चित झाल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित होईल. यामुळे कुठेली टोल भरायला न थांबता, जितके किलोमीटर महामार्गावरून प्रवास झाला असेल तेवढ्या अंतरासाठी थेट पैसे कापले जाणार आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

ठाकरे सरकारकडून दोन दिवस आधीच जनतेचा एप्रिल फुल

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी परतावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली- मेरठ हायवेची सेवा मंगळवारपासून जनसामान्यांसाठी खुली करण्यात आली. या हायवेमुळे या मार्गावरील ट्रॅफिकमधून लोकांची सुटका झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर २००८ मध्ये विचार करण्यात आला होता. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाल होते.

हा हायवे २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाला उशिर झाला. मात्र आता रस्ता पूर्ण झाला असून दररोज या रस्त्यावरून ५० हजार ते १ लाख वाहने जात आहेत.

Exit mobile version