देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवार, १९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील १०२ मतदार संघात मतदान होणार आहे. या निवडणुकीत युवा वर्गाची संख्या जास्त असून निवडणूक आयोगानेही नवनवी शक्कल लढवत सर्वच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अशातच एअर इंडिया एक्सप्रेसनेही मतदानाचा प्रचार करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसकडून प्रथमच मतदान करायला जाणाऱ्या युवा वर्गाला विमानाच्या तिकिटांवर विशेष सवलत दिली जाणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस प्रथमच मतदारांसाठी तिकिटांवर विशेष सवलत देणार आहे. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विमान तिकिटावर १९ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत, एअरलाइन्स १८ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना सवलत देणार आहे. हे तरुण पहिल्यांदाचं त्यांच्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.
हे ही वाचा:
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला सीआरपीएफ जवान!
प. बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक
‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान यांच्या अटकेचे वृत्त खोटे; चौकशीनंतर दिले सोडून!
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. ही सूट १८ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल ऍप आणि वेबसाइट https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग यांनी म्हटले आहे की, एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे.