प्रतीक्षा संपली … रौप्यमहोत्सव साजरा करताना ऍपल आले मुंबईत

ऍपल भारतात २५ वर्षे पूर्ण करत असतानाच हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे

प्रतीक्षा संपली … रौप्यमहोत्सव साजरा करताना ऍपल आले मुंबईत

प्रतीक्षा संपली आयफोन निर्माता ऍपलने मंगळवारी मुंबईत पाऊल ठेवले. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या ऍपल स्टोअरचे उद्घाटन केले. भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरने मुंबईच्या ग्राहकांसाठी आपले दरवाजे खुले केले आहे विशेष म्हणजे ऍपल भारतात २५ वर्षे पूर्ण करत असतानाच हे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू झाले आहे.

ऍपलने भारतात १९८४ मध्ये पहिल्यांदा मॅकिन्टोश मध्ये आणले होते आणि आता २५ वर्षांनंतर मुंबई मध्ये पहिले ऍपल स्टोअर उघडले आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “हा एक लांबचा प्रवास आहे, ऍपल भारतात आपले स्टोअर उघडत आहे याचा मला आनंद आहे.” मुंबईतील पहिल्या स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी शेकडो चाहते उपस्थित होते . सकाळी ११ वाजल्यापासूनच लोक स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करण्याची प्रतीक्षा करत होते.

हे ही वाचा:

प्रख्यात गायिका आशा भोसले यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी 

महाराष्ट्राला हे भूषण नाही!

भरमसाठ संख्या वाढल्यामुळे १ लाख माकडे श्रीलंकेतून निघाली चीनला

अतिक अहमदची बेहिशोबी मालमत्ता, ११,६८४ करोडच्या घरात !

कंपनीने स्टोअरची वेळही जाहीर केली आहे. ऍपल स्टोअर सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईतील ऍपल बीकेसी आणि दिल्लीतील ऍपल साकेत नंतर, ऍपल स्टोअरची एकूण संख्या ५५२ पर्यंत पोहोचेल. यामध्ये क्युपर्टिनोमधील ऍपल पार्क व्हिजिटर सेंटरचा समावेश आहे. जगभरातील आयफोन आणि इतर उत्पादने विकणाऱ्या कंपनीच्या २५देशांमध्ये ऍपल स्टोअर्स आहेत. मुंबईचे स्टोअर सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांचा आणि सेवांचा थेट लाभ मिळणार आहे. हे ऍपल स्टोअर २० भाषांमध्ये ग्राहक सेवा देण्यास सक्षम आहेत.

असे आहे ऍपल स्टोअर

हे स्टोअर २०,०००चौरस फूट परिसरात पसरले आहे. रचना आकर्षक आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे. सम्पूर्ण स्टोर अक्षय ऊर्जेवर चालणार आहे. स्टोअरमध्ये प्रकाशाचा किमान वापर करण्यात काचेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे, स्टोअरमध्ये ४.५० लाख लाकडी घटक वापरण्यात आले आहेत.

Exit mobile version