महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी यशस्वीरित्या गडचिरोली जिल्ह्यातील गरदेवाडा येथे पोलिस चौकी स्थापन केली आहे.१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये पसरलेल्या या दुर्गम प्रदेशात पोलिसांची ही पहिली उपस्थिती आहे.आजपर्यंत या नक्षलग्रस्त भागात पोलिसांना प्रवेश न्हवता.मात्र, आता याच ठिकाणी पोलिसांनी प्रथमच चौकी बांधली आहे.
बांधण्यात आलेली ही चौकी, माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमदपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे.नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी ही चौकी अतिशय महत्वाची ठरणार आहे. या पोलीस चौकीच्या स्थापनेसाठी सुमारे ६०० कमांडो गेले होते.भूसुरुंग आणि झुडुपांमध्ये लपून बसलेले नक्षलवादी हल्ला करतील याच्यावर देखील कमांडोंची नजर होती.या दुर्गम भागात पोलीस चौकी उभारणे अतिशय अवघड होते.गरदेवाडा गाठण्यासाठी कमांडोंना ६० किलोमीटर पायपीट करावी लागली.
पोलीस चौकी उभारण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळाला.सुमारे १५०० लोकांनी मिळून ही पोलीस चौकी एका दिवसात उभारली.या संकुलात पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पुरेशी सोय करण्यात येणार असून, कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
हे ही वाचा:
अयोध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात!
मालदीवचे भारतीय सैनिक सरकारच्या सूचनांच्या प्रतीक्षेत
‘इंडिगो कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली असती तर…’
दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती
पूर्व विदर्भातील अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यात वसलेले गरदेवाडा पोलीस चौकी अबुझमद जवळ आहे.तसेच सीमेच्या पलीकडे छत्तीसगडच्या कांकेर येथील मारबेडा पोलीस छावणीपासून ५.५ किमी अंतरावर आहे. हा परिसर माओवाद्यांची गुहा म्हणून ओळखला जातो.नक्षलवाद्यांचे शिबिरे, छपाई, शिवणकाम आणि शस्त्रास्त्रे व दारूगोळा यासह विविध कामांसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे.याशिवाय नक्षलवाद्यांनी या ठिकाणी शस्त्रेही लपवून ठेवली आहेत.या ठिकाणी पोलिसांना देखील प्रवेश न्हवता.मात्र, आता पोलिसांनी तेथे पोलीस चौकी बांधली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माओवाद्यांनी तीन शक्तिशाली IEDs स्फोट करून मतदानात व्यत्यय आणला तेव्हा गरदेवाडा प्रकाशझोतात आला.या ठिकाणी एक ताडगुडा नाला आहे, जो पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतो.अशा परिस्थितीत पोलिसांना हा नाला पार करता शक्य नसते आणि याचा फायदा नक्षलवाद्यांना लपण्यासाठी होतो.ही पोलीस चौकी उभारल्यानंतर नाल्याच्या ठिकाणी पूलही बांधण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.