30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर

पंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर

साताऱ्यात पुरस्काराचे वितरण केले जाणार

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजघराणे आणि तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजघराणे आणि तमाम शिवभक्तांच्या वतीने यंदा पहिल्यांदा ‘शिवसन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. साताऱ्यात १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

हे ही वाचा:

हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!

‘पंतप्रधान मोदी यांची माफी मागा’

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!

“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”

पुरस्कार वितरणाचा सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. या जागेची बुधवारी दुपारी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी करून कार्यक्रमाची तयारी, त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, सुरक्षा आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. यावेळी सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा