काय आहे ‘सेफ स्कूल झोन’? वाचा सविस्तर

काय आहे ‘सेफ स्कूल झोन’? वाचा सविस्तर

मुंबईतील रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने एक पाऊल उचलले आहे. महापालिकेतील मुंबईतील पहिला ‘सेफ स्कूल झोन’ तयार करण्यात आला आहे. भायखळा येथे प्रायोगिक तत्त्वावर हा ‘सेल्फ स्कूल झोन’ तयार करण्यात आला आहे.

महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या माध्यमातून भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर शहरातील पहिला ‘सेफ स्कूल झोन’ प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. हा प्रकल्प ‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ यांच्यातर्फे हाती घेण्यात आला असून मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रस्ता वापरकर्त्यांसाठी विशेषतः मुलांसाठी रस्ते चालण्याजोगे, सुरक्षित, विनाअडथळा आणि अधिक चैतन्यमय करणारी डिझाइन सोल्यूशन्स या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात राबविण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

अभिमानास्पद! १०० कोटी लसीकरण पूर्ण

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

मिनी महाविकास आघाडीने केली घटनेची मोडतोड?

डिझाइन सोल्यूशनमध्ये माहितीफलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी व वाट पाहण्यासाठी एखादा निश्चित भाग नियुक्त करणे, पिक- अप झोन, ड्रॉप झोन यासह मल्टियुटिलिटी झोन्स निश्चित करणे, खेळण्यासाठी काही घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा समावेश यामध्ये आहे. कमी खर्चाच्या साहित्याचा वापर करून केलेल्या या प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरुपी करण्यात येतील.

‘विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शाळेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच, शाळेत जाण्याचा मार्गही सुरक्षित असावा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईत शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी रस्ते चालण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने अनेक पालक त्यांच्या वाहनांनी मुलांना शाळेत पोहोचवतात. मुलांसाठी रस्ते सुरक्षित केल्याने रस्ते वापरणाऱ्या सर्वांसाठीच ते सुरक्षित कसे होतील, हे या प्रयोगातून दिसून येईल,’ असे समाजवादी पार्टीचे स्थानिक नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.

Exit mobile version