आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली आहेत पण इतिहासातील महत्वाच्या घटनांमध्ये ज्या अतिशय महत्वपूर्ण घटना होऊन गेल्या त्यामध्ये एक नाव म्हणजे तात्या टोपे यांचे नाव घ्यावे लागेल. थोर सेनानी तात्या टोपे म्हणजेच रामचंद्र पांडुरंग येवलकर यांचा जन्म १६ फेब्रुवारीला १८१४ मध्ये महाराष्ट्रात पाटोदा जिल्ह्यातील येवला गावी झाला. त्यांचे वडील पांडुरंग येवलेकर हें दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारात कार्यरत होते. तात्या टोपे हे प्रचंड हुशार, बुद्धिमान,आणि शूरवीर होते. कोणतेही काम ते मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने पूर्ण करत असायचे दुसरे बाजीराव हे त्यांच्या समर्पण या वृत्तीवर खूपच खुश होते म्हणूनच त्यांना बिठूर किल्ल्याचा कारकून म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अमर क्रांतिकारी वीर तात्या टोपे जी की जयंती पर उन्हें विनम्र अभिवादन। pic.twitter.com/eqUVRH0sQl
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 16, 2023
हाती आलेले काम चोख करणे हीच त्यांची वृत्ती होती म्हणूनच त्यांना पेशव्यांनी खुश होऊन रत्नजडित टोपी बक्षीस म्हणून दिली म्हणूनच त्यांना त्यानंतर रामचंद्र पांडुरंग उर्फ तात्या टोपे म्हणूनच ओळखले जाऊ लागले. १८५७ च्या लष्करी उठावाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध अशीच ओळख आहे.
याच बंडामुळे ब्रिटिश राजवटीला उघड उघड आव्हान दिले होते. जरी ते पूर्णपणे यशस्वी झाले नसले तरी ती यामुळेच भारतीयांच्या मनांत स्वातंत्र्यची ज्योत प्रज्वलित झाली होती. इंग्रजां विरुद्धच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यात्या टोपे हे एक प्रमुख लढवैये होते. जेव्हा इंग्रज सरकारने नानासाहेबांना त्यांच्या वडिलांची पेंशन देणे बंद केले त्यावेळेस नानासाहेब यांनी इंग्रजांशी वैर धरले होते , तात्या टोपे हे नांनाचे समर्थक असल्यामुळे त्यांनीही इंग्रजांशी वैर धरले होते. १८५७ साली दिल्लीमध्ये उठाव झाला त्यावेळेस झाँसी, ग्वाल्हेर, लखनौ, हि राज्ये १८५८ साली स्वतंत्र झाली. शिवाय दिल्लीबरोबरच आझमगढ , गोंडा, हे सर्व भाग इंग्रज राजवटीपासून पूर्ण मुक्त झाले. पण झाशीची राणी लक्ष्मी बाई यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तात्या टोपे यांनी नानासाहेब पेशव्यांचे सैन्य पूर्णपणे हाताळले. सैनिकांच्या पूर्ण नियुक्त्या, पगार, प्रशासन यांची संपूर्ण माहिती तात्यांकडे होती. सर्व देखरेख या विभागाची तात्याचं करत होते. अचूक आणि त्वरित निर्णय हि त्यांची विशेष बाब होती.
हे ही वाचा:
श्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली
आधी गळा आवळून खून .. मग मृतदेह ७२ तास फ्रिजमध्ये ठेवला!
खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा
पेशवाई संपल्यावर बाजीराव ब्राह्वर्तात गेले ,तेव्हा तात्यांनी पूर्ण राज्यसभेची जबाबदारी बघितली. १८५७ च्या लढ्यात एकटे तात्या इंग्रजांविरुद्ध यशस्वीपणे लढले. तीन जून १८५८ ला रावसाहेब पेशव्यांनी तात्यांना सेनापती केले होते. यावेळेस तात्यांना राज्यसभेत भरलेल्या जनतेसमोर रत्नजडित तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
१८ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाईच्या हौतात्म्यानंतर तात्यांनी गनिमी कावा पद्धती अवलंबली. त्यानंतर कोलारस जंगलात तात्या टोप्यांनी गनिमी कावा चालवल्याचा अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. सात एप्रिल १८५९ रोजी तात्या शिवपुरी गुणांच्या जंगलात झोपलेले असताना त्यांची फसवणूक करून पकडले गेले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तो चालवून १५ एप्रिल १८५९ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तात्या टोपे यांना १८ एप्रिल १८५९ रोजी फाशी देण्यात आली. *