सतरा दशकांपूर्वी आजच्या तारखेला म्हणजेच २२ डिसेंबर १८५१ रोजी भारतीय रेल्वेचा प्रवास मालगाडीने सुरू झाला होता. दोन डब्यांची ही मालवाहतूक रेल्वे आयआयटीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमधील रुरकी आणि पाच किमी अंतरावरील धार्मिक ओळख असलेल्या पिरान कालियार दरम्यान धावली होती.
त्यापूर्वी सन १८५१ च्या सुमारास रेल्वे प्रणालीच्या परिचयासाठी नाविन्यपूर्ण आणि नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली. थॉमसन यांनी सन १८५१ मध्ये पहिले वाफेचे इंजिन रुरकी येथे चालवले. त्यानंतर, भारतातील पहिली लोकल ट्रेन शनिवार, १६ एप्रिल १८५३ रोजी बोरी बंदर, मुंबई ते ठाणे ३४ किलोमीटर अंतरासाठी रवाना झाली. १४ डब्यांच्या या पहिल्या लोकल ट्रेनचा जवळपास चारशे प्रवाशांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता.
खरं तर, ब्रिटिश राजवटीत, हरिद्वारमध्ये गंगा कालव्याच्या बांधकामादरम्यान लाखो टन माती काढण्यात इंग्रज अयशस्वी झाले. त्यासाठी मग इंग्लंडमधून खास वॅगन्स आणि इंजिने आयात करण्यात आली. सहा चाके आणि सुमारे दोनशे टन लोड क्षमता असलेली ही मालगाडी धावण्यासाठी रुरकी ते पिरान कालियारपर्यंत ट्रॅक टाकण्यात आला होता. जेव्हा ही ट्रेन प्रथमच धावली तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानला मात देत भारताने कोरले कांस्यपदकावर नाव
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने नकोच
उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?
मात्र, इंग्रजांनी बांधलेला हा रेल्वेमार्ग पुन्हा वापरला गेला नाही. रेल्वेने हे ऐतिहासिक रेल्वे इंजिन रुरकी रेल्वे स्थानक परिसरात लोकांच्या दर्शनासाठी ठेवले आहे.