स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन

भारतातील रेल्वे नकाशावर अखेर मणिपूरचे अस्तित्व आले आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोईनांगलाँग येथील राणी गैडिनलिउ रेल्वे स्थानकात पहिली मालवाहू ट्रेन दाखल झाली. यामुळेच मणिपूर आता देशाच्या रेल्वे नकाशावर आला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्याच्या विकासाचा आणखी एक मैलाचा दगड, पहिली मालवाहू ट्रेन तामेंगलाँगच्या राणी गैडिनलिउ रेल्वे स्टेशनवर पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा केल्याने मणिपूरच्या सामाजिक- आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मोदी सरकार हे राज्यात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि या भागातील आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असते, असेही ते म्हणाले.

भारताच्या ईशान्य भागाचे परिवर्तन सुरूच आहे. मणिपूरची कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे. त्यामुळे व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यातील सुरेख  उत्पादने संपूर्ण देशभरात पोहोचतील, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

जीवाच्या भीतीने कॅनडाचे राष्ट्रपती अज्ञातवासात

‘दंगल ऑफ क्राईम’….कुस्तीपटू सुशील कुमारवर माहितीपट

पंतप्रधान मोदींनी घेतली कॉलर वाली वाघीण आणि ‘विराट’ची दखल

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतर, पहिली मालगाडी दोन दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये दाखल झाली. जिरीबाम ते राज्याची राजधानी इंफाळपर्यंतच्या १११ किमी लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला २०१३ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. हा रेल्वे मार्ग डोंगराळ भागांमधून जातो. या मार्गावर सुमारे एकूण ४६ बोगदे आणि १५३ पूल आहेत. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या दिग्गज स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मरणार्थ कैमेई रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी गैडिनलियउ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.

Exit mobile version