राममंदिरात सोन्याचे दार लागले!

उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी

राममंदिरात सोन्याचे दार लागले!

अयोध्येतील राम मंदिरामधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना येथील कामाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या गर्भगृहाच्या पहिल्या मजल्यावर पहिले सुवर्णद्वार बसवण्यात आले आहे. या सुवर्णद्वाराची उंची १२ फूट तर रुंदी आठ फूट आहे.

राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. यासाठी मंदिरात पहिले सुवर्णद्वार बसवण्यात आले आहे. आता पुढील तीन दिवसांत उर्वरित १३ सुवर्णद्वारे बसवण्यात येतील, अशी माहिती उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. राम मंदिरात एकूण ४६ द्वारे बसवण्यात येणार आहेत. त्यातील ४२ दरवाजे सुवर्णलेपित असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाने केली बँक मॅनेजर प्रेयसीची हत्या

बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!

भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध बिघाडाचे सावट मालदीवच्या आरोग्य पर्यटनावर

तीन दिवसांत ३० टक्के पर्यटकांची मालदीवकडे पाठ!

उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, या दिवशी संपूर्ण राज्यात मद्यविक्रीला बंदी असेल, असेही जाहीर करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, स्वच्छता मोहिमेसाठी ‘कुंभ मॉडेल’ राबवण्याच्या सूचना केल्या. योगी आदित्यनाथ यांनी १४ जानेवारीपासूनच अयोध्येत स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

सात हजारांहून अधिक आमंत्रित
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आयोजित भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सुमारे सात हजारांहून अधिक जणांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिर ट्रस्टने राजकीय व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रेटिज, क्रिकेटपटू आणि उद्योजकांनाही विशेष निमंत्रित केले आहे.

Exit mobile version