भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

मागील दोन स्पर्धांमध्ये भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशियाई स्क्वॉश सांघिक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय संघाने कुवेतवर २-० असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

भारताच्या रमित टंडनने अली आरामजीचा ११-५, ११-७,११-४ असा पराभव करत आघाडी घेतली. तर सौरव घोसालने अम्मर अल्तामिमीचा ११-९, ११-२, ११-३ असा पराभव करून यलो टॅग निश्चित केला. या दोघांनी भारताला २-० असा विजय संपादन करून दिला. भारताने २-० अशी आघाडी घेतल्यामुळे अभय सिंग-फलाह मोहम्मद यांच्यामधील लढत खेळवण्यात आली नाही.

मागील दोन स्पर्धांमध्ये भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघाने ‘अ’ गटामध्ये कतार, पाकिस्तान, कुवेत, दक्षिण कोरिया, चायनीज तैपई यांना पराभूत करीत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर उपांत्य फेरीत भारतीय पुरुष संघाने मलेशियाचे आव्हान २-१ असे परतवून लावत अंतिम फेरीत प्रवेश केला.

हे ही वाचा:

ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस

दरम्यान, भारतीय महिला संघाचा ‘ब’ गटात समावेश होता. या गटात भारतीय महिला संघाने इराण व सिंगापूरला नमवले. तसेच हाँगकाँगकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत मलेशियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागल्याने महिला संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Exit mobile version