26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषठरलं; ओडिशातील भाजपाचे पहिले सरकार १२ जून रोजी शपथ घेणार!

ठरलं; ओडिशातील भाजपाचे पहिले सरकार १२ जून रोजी शपथ घेणार!

नवीन मुख्यमंत्र्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात

Google News Follow

Related

ओडिशातील पहिले भाजपचे सरकार १० जून रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार होते, परंतु आता हा शपथविधी १२ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाने नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही.पंतप्रधान मोदी १० जून रोजी ओडिशाला जाण्यास असमर्थ असल्यामुळे शपथविधी सोहळ्याची तारीख बदलण्यात आली आहे. रविवारी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा सोमवारचा दिवस व्यग्र असेल आणि त्यामुळे ते भुवनेश्वरमधील समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

त्याचप्रमाणे, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक, जी आधी १० जून रोजी होणार होती, ती ११ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या ७८ सदस्यीय विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपचे संसदीय मंडळ त्यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे ज्येष्ठ आमदार सुरेश पुजारी, मोहन चरण माळी आणि केव्ही सिंग देव यांच्यासह अनेक नावे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचीही चर्चा होत असली तरी त्यांनी मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचप्रमाणे आणखी एक संभाव्य अश्विनी वैष्णव यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले आहे.
पुढच्या मुख्यमंत्र्याच्या नावावरून गूढ कायम असताना भुवनेश्वरच्या जनता मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची सर्व तयारी सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते आणि शपथविधी सोहळा प्रभारी दिलीप मोहंती यांनी रविवारी सांगितले की, ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आता १२ जून रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

‘ओडिशातील लोकांच्या साक्षीने जनता मैदानावर शपथविधी सोहळा पहिल्यांदाच होणार असून हे ऐतिहासिक आहे. हे पूर्वी गव्हर्नर हाऊसमध्ये होत असे. हे दोन ते तीन दशकांनंतर होत आहे. आम्हाला आशा आहे की ओडिशातील प्रत्येकजण या कार्यक्रमात भाग घेईल,’ असा विश्वास मोहंती यांनी व्यक्त केला.

यापुढे हे जनतेचे सरकार असल्याचे सांगून राज्यातील जनता त्यात योगदान देईल, असे सांगितले. ‘पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील आणि ते सर्वांना भेटतील. ते पंतप्रधानांना भेटतील, याबद्दल लोकांमध्ये उत्साह आहे,’ मोहंती म्हणाले.
जनता मैदानावर ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संध्याकाळी भुवनेश्वरमध्ये रोड शो करणार आहेत.

हे ही वाचा:

‘पुन्हा भाजपचा जयजयकार केल्यास जमिनीत गाडून टाकू’

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची जगभरात चर्चा!

इस्रायलच्या युद्धनियोजन मंत्र्यांचा राजीनामा

व्ही. के. पांडियन यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती

दरम्यान, बिजू जनता दल (बीजेडी) नेते आणि काळजीवाहू ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे सहकारी, व्हीके पांडियन यांनी रविवारी ओडिशा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. सन २०००च्या बॅचचे आयएएस अधिकारी पांडियन यांनी नवीन पटनायक यांचे दोन दशकांहून अधिक काळ खासगी सचिव म्हणून काम केले आहे. सन २०२३मध्ये, नोकरशाहीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते बीजेडीमध्ये सामील झाले.

ओडिशा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या हातून बिजू जनता दलाला पराभव पत्करावा लागला आणि नवीन पटनायक यांच्या २४ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. १४७ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला ७८ जागा मिळाल्या. बीजेडीने ५१ जागा मिळवल्या. तर, काँग्रेसने १४ जागा मिळवल्या.
लोकसभा निवडणुकीतही भाजपने राज्यातील २१ पैकी २० जागा मिळवून चांगली कामगिरी केली; उर्वरित एक जागा काँग्रेसने जिंकली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा