जगभरातील बहुचर्चित प्रश्न म्हणजे कोंबडी आधी जन्माला आली का अंड? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आज पर्यंत तरी देता आले नव्हते. मात्र, या बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या ‘सायंटिफिक फॅक्ट’ नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळाने या उत्तराची पुष्टी केल्याचे वृत्त आहे.
वैज्ञानिकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘कोंबडीच आधी जन्माला आली’ असे दिले आहे. कोंबडीच आधी जन्माला आली आहे. उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये पक्षांमध्ये झालेल्या जनुकीय अपघातातून कोंबडी प्रथम जन्माला आली. अंड्याच्या कवचासाठी लागणारे प्रथिने फक्त कोंबडीच निर्माण करू शकते, असे स्पष्टीकरण विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या ‘सायंटिफिक फॅक्ट’ नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळाने दिले आहे.
हे ही वाचा:
अमित शहा, नितीन गडकरी यांच्या नावाने लस प्रमाणपत्र
‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’
‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये जनुकीय बादलातून अनेक सजीव जन्माला आले. त्यांच्या भोवतालच्या पर्यावरणीय गरजांनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतले. ज्यांनी हे बदल केले नाही असे सजीव कालांतराने नष्ट झाले. सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रथम कोंबडी जन्माला आली आणि नंतर तिने अंड्यातून प्रजोत्पत्ती करायला सुरुवात केली, असे स्पष्टीकरण समोर आले असून त्यामुळे आधी कोंबडी हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर अखेर सापडले आहे.