मुंबई महानगर क्षेत्रातील पहिले इको- टुरिझम गाव विरारमध्ये!

मुंबई महानगर क्षेत्रातील पहिले इको- टुरिझम गाव विरारमध्ये!

कांदळवन कक्षाने मुंबई महानगर प्रदेशातील पहिले इको-टूरिझम गाव म्हणून विरार येथील मारंबळपाडा गाव विकसित करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे वातावरण बदलाच्या लढ्याला गती मिळणार आहे. पर्यटकांसाठी कांदळवन क्षेत्र खुले करण्यात आले असून विरारपासून कांदळवन सफारीसाठी बोटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे मुंबई क्षेत्रातील पहिले इको-टुरिझम गाव ठरले आहे.

कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय म्हणून मारंबळपाड्यातील परिसराला इको- टुरिझम विकास करण्याच्या दृष्टीने पाहिले पाऊल आहे. तसेच पर्यटकांना बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, पक्षी निरीक्षण, मँग्रोव्ह बोडवॉक, बेटाला भेट देणे असे अनेक उपक्रम विरार परिसरात उपलब्ध असतील. पर्यटकांसाठी खास ३६० अंशातील डेक सभोवतालच्या परिसरातील विहंगम दृश्य पाहण्याच्या दृष्टीने खास योजना केली आहे. तसेच मेरीटाईम बोर्डाची निवारा शेडही रंगविण्यास बोर्डाने परवानगी दिलो आहे, अशी महिती कांदळवन प्रतिष्ठानचे पर्यावरून शास्त्रज्ञ आणि (प्रकल्प) उपसंचालक डॉ. शीतल पाचपांडे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी केंद्राने सुमारे ४५ लाख रुपये दिले असून त्या मध्ये इनरव्हील प्रकल्पाचे १५ लाख रुपयांचे योगदान आहे. उर्वरित निधी हा कांदळवण कक्षांतर्गत असलेल्या प्रतिष्ठानकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

मुख्यमंत्री शिंदेंकडून वसई दुर्घटनेतील मृतांना ६ लाखांची मदत जाहीर

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

वैशिट्य म्हणजे कांदळवण क्षेत्राला धक्का न देता तीन कंटेनरच्या माध्यमातून केंद्र उभारण्यात आले आहे. पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती, कांदळवन आणि जैवविविधता ह्यांच्या बाबत आकर्षक पद्धतीने माहिती प्रदर्शनात पाहायला मिळेल. मारंबळपाडा इको-टुरिझम परिसर वैतरणा नदी व अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. विरार रेल्वे स्थानकापासून अवघे १० – १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

Exit mobile version