मुंबईतल्या सर्वसामान्य चाकरमान्यांना नरेंद्र मोदी सरकारने खास गिफ्ट दिले आहे. मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या मुंबई लोकांच्या प्रथम श्रेणी प्रवास आता स्वस्त होणार आहे. फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात कपात करण्यात येणार आहे.
गुरुवार ५ मे पासून हे नवे बदल लागू केले जाणार आहेत. पण हे बदललेले दर दैंनदिन तिकिटाच्या बाबत असून महिन्याच्या पासच्या किंमतीत कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्क्यांनी कमतरता करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला फर्स्ट क्लाससाठी कमीत कमी ५० रुपयांचे भाडे आहे ते कमी करून २५ रुपये करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका
‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’
हंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा
तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या अंतराचे भाडे १४० रुपये आहे. जे कमी करून ८५ रुपये करण्यात आले आहे. तर मुंबई ते कल्याण या अंतराचे भाडे १०० रुपये करण्यात आले आहे. जे या आधी १६५ रुपये होते.
केंद्र सरकारने आधी एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी केले. या दरातही सरकारने ५० टक्क्यांची कपात केली. त्यामुळे उन्हाच्या झळा बसणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. रोज तब्बल वातानुकूलित गाडीच्या ८० फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावत असतात. त्यातच आता प्रथम श्रेणीचेही दर कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठी गुड न्यूज मिळाली आहे.