धैर्यमूर्ती ‘येसू वहिनी’ सावरकर यांचे पहिले साधार चरित्र प्रकाशित

धैर्यमूर्ती ‘येसू वहिनी’ सावरकर यांचे पहिले साधार चरित्र प्रकाशित

अपर्णा चोथे लिखित यमुना गणेश सावरकर उर्फ येसू वाहिनी यांच्या चरित्राचे प्रकाशन १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पार पडले. ‘तू धैर्याची अससी मूर्ती’ असे या चरित्राचे नाव असून येसू वहिनींचे हे पहिलेच साधार अधिकृत चरित्र आहे.

येसू वहिनींच्या या चरित्रातून त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक अपरिचित किंवा प्रकाशझोतात नसलेल्या गोष्टी वाचकांना वाचायला मिळणार आहेत. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात पार पडलेल्या कार्यक्रमात नारायणराव सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तर या प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य उपस्थित होत्या. सात्यकी सावरकर यांच्या मृत्युंजय प्रकाशनातर्फे हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. युवा इतिहास अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग हे देखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थित होते.

“भारतीय स्त्री ही अबला कधीच नव्हती. हिंदू धर्मातील कुठलीही देवता बघितली तर तिच्या हाती शस्त्र आहे. कुणी नास्तिक असेल तर राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई या पराक्रमी महिलांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच. आझाद हिंद सेनेत देखील महिला पथक होते. त्यामुळे स्त्री ही कधीच अबला नाही” असे ठाम प्रतिपादन करून “मालिकांनी भारतीय स्त्री ची चुकीची प्रतिमा रंगवली” असे स्वामिनी सावरकर म्हणाल्या. तर शेफाली वैद्य यांनी “माझे वडील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते त्यामुळे सावरकर कुटुंबीयांचा त्याग मी समजू शकते” असे प्रतिपादन केले.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सावरकर कुटुंबियांचे योगदान फारच मोलाचे आहे. या कुटुंबातले तीन भाऊ या संग्रामात होतेच पण तितक्याच भक्कमपणे त्या तिघांच्या पत्नीही त्यांच्यासोबत उभ्या होत्या. पण अनेकदा त्यांच्या कार्याची म्हणावी तितकी नोंद घेतली जात नाही. पण याला छेद देण्याचा प्रयत्न इतिहास अभ्यासकांकडून होत आहे.

Exit mobile version