रशियातील स्पुतनिक व्ही कोविड-१९ लसीच्या कोट्यवधी डोसची पहिली मोठी खेप सोमवारी म्हणजेच आज रात्री भारतात पोहोचणार आहे. या लस उत्पादक कंपन्यांकडून येत्या दोन महिन्यांत एकूण १८ मिलियन डोस मिळण्याची अपेक्षा आहे. रशियाने भारताला दोन तुकड्यांमध्ये २ लाख १० हजार डोसचा पुरवठा केला असून, मे महिन्यात अपेक्षित असलेले एकूण ३० लाख डोस आज भारतात पोहोचतील.
यापैकी ३० लाख डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि भारतात लोकांना ही लस दिली जात आहे. यानंतर जूनमध्ये ५० लाख डोस आणि जुलैमध्ये १ कोटी डोस निर्यात केले जातील. कोविड-१९ च्या विरुद्ध ९१.४ टक्के संरक्षण पुरविणारी स्पुतनिक व्ही आपत्कालीन उपयोगासाठी प्राधिकरणाने एप्रिलमध्ये भारताला मंजूर केलेली तिसरी कोरोना लस होईल. लसीच्या रशियन उत्पादकांनी डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेशी करार केलाय. वर्षाकाठी ८५० मिलियन डोस तयार करण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांशी करार केलेत.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) किंवा रशियाच्या सार्वभौम संपत्ती फंडने अलीकडेच जाहीर केले की, तंत्रज्ञान हस्तांतरित झाल्यानंतर या उन्हाळ्यात भारतातील लसीचे पूर्ण प्रमाणात उत्पादन सुरू होईल. ऑगस्टपर्यंत भारतात उत्पादन सुरू करण्याचा विचार दोन्ही बाजूंनी करीत आहेत.
हे ही वाचा:
काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी, फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण
भारताने फटकारल्यानंतर डब्ल्यूएचओने कोरोना उपप्रकाराचे नाव बदलले
कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी
नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक
हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथे पॅनेसिया बायोटेकच्या सुविधांमध्ये तयार करण्यात आलेल्या लसींची पहिली तुकडी पूर्ण प्रमाणात उत्पादन सुरू होण्यापूर्वी रशियाच्या गमालेया केंद्रात गुणवत्ता नियंत्रण तपासणीसाठी पाठविली जाईल. रशियामध्ये भारताचे राजदूत डी. बी. वेंकटेश वर्मा यांनी नुकतेच सांगितले की, जगभरात उत्पादित स्पुतनिक व्हीच्या सर्व डोसपैकी सुमारे ७० टक्के डोस भारतात तयार केले जातील. सर्व प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्या तरी रशियाच्या बाजूने लसची एकल डोस आवृत्ती स्पुतनिक लाईटसाठी नियामक मान्यता देखील मागण्यात आलीय. २०२० च्या डिसेंबर ते एप्रिल २०२१ दरम्यान रशियाच्या जन लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एकाच शॉटनंतर गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, स्पुतनिक लाईटने ७९.४ टक्के कार्यक्षमता दर्शविली आहे.