राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!

नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना यूपी पोलिसांनी पकडले

राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. राजा उर्फ ​​मोहम्मद दानिश उर्फ ​​जहीर/साहीर खान असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जहीर खान नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र महसी विभागातील राजी क्रॉसिंगवर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी सहा लोकांवर गुन्हा दाखल असून त्यांचा तपास सुरु आहे, यातील काही आरोपी नेपाळला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

बहराइच हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ११ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. राम गोपालच्या हत्येप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद दानिश उर्फ ​​साहिर/झहीर खान या आरोपींपैकी एक होता. त्याच्याशिवाय अब्दुल हमीद, सरफराज, फहीम हेही या प्रकरणात आरोपी आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा :

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मिळणार संस्कृतचे धडे

जस्टीन ट्रुडो अखेर झुकले; भारताविरोधात केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती, ठोस पुरावा नाही

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीची धाड, ८५ कोटींची मालमत्ता जप्त!

न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

दरम्यान, इस्लामिक कट्टरवाद्यांनी रविवारी (१३ ऑक्टोबर २०२४) बहराइचमध्ये दुर्गा पूजा मिरवणुकीवर हल्ला केला होता. यावेळी इस्लामिक कट्टरवाद्यांनी राम गोपाल मिश्रा तरुणाची हत्या केली होती. राम गोपाल मिश्राचा काल (१६ ऑक्टोबर) शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला होता. अहवालानुसार, राम गोपाल मिश्राची हत्या करण्यापूर्वी त्याला विजेचा धक्का दिला, पायाची नखे उपटून धारदार शस्त्रांनी वार केले आणि त्याच्या शरीरावर तब्बल ३५ गोळ्या झाडल्या. या सर्व जखमांमुळे त्याला ब्रेन हॅमरेज होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version