केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पहिली अटक केली आहे. अमित शहा एडिटेड व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अरुण रेड्डी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.अटक करण्यात आलेला अरुण रेड्डी हा स्पिरिट ऑफ काँग्रेस या नावाने ट्विटर अकाउंट चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण रेड्डी हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा (AICC) सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक आहे. अरुण रेड्डी यांच्यावर मोबाईलमधून पुरावे मिटवल्याचाही आरोप आहे.त्याचा मोबाईल फोनही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जात असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!
पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…
नकली सेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यात सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत आहे?
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो…
दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या अरुण रेड्डी यांना उद्या शनिवारी(४ एप्रिल ) न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे.अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणात अरुण रेड्डी यांची असलेली भूमिका दिल्ली पोलीस कोर्टामध्ये उघड करणार आहेत.तसेच दिल्ली पोलीस अरुण रेड्डी यांच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून ही पहिलीच अटक आहे.अटक करण्यात आलेल्या अरुण रेड्डी याला उद्या न्यायालयात हजर केल्यानंतर एडिटेड व्हिडिओ प्रकरणातील पुढील माहिती समोर येणार आहे.