मुंबईतील नवनिर्मित शिवडी-न्हावाशेवा उड्डाणपूल अर्थात अटल सेतूवर पहिली दुर्घटना समोर आली आहे. त्यात एक महिलेला किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी झालेल्या या घटनेत एक गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती गाडी दुभाजकाला धडकली आणि काहीवेळा उलटून थांबली. या दरम्यान कोणतेही अन्य वाहन न धडकल्याने मोठा अपघात होण्यापासून टळला.
या गाडीत पाच प्रवासी बसले होते. ज्यात पाच ते ११ वर्षांपासूनची दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश होता. लाल रंगाची मारुती गाडी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने जात होती. या दरम्यान ही गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. गाडी चालवणाऱ्या महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या कठड्याला आदळली.
हे ही वाचा:
चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले
प्रभू श्री रामांच्या आगमनासाठी अयोध्यानगरी सजली
२०१० पासून बेपत्ता असलेला नक्षलवादी संतोष शेलार आत्मसमर्पणाच्या तयारीत
१५ वर्षांच्या जमिनीवरून वादाचे पर्यवसान गँगवॉरमध्ये, नोएडात एकाची हत्या!
गाडी उलटल्यानंतर काही वेळ गाडी पुलावरूनच घसरत गेली आणि पूर्वपदावर आली. या अपघातामुळे गाडीच्या पुढील काचेचा चक्काचूर झाला असून गाडीच्या छताचेही नुकसान झाले आहे.