भारतातील पहिल्या त्रिमितीय छपाईच्या (3D Printing) माध्यमातून उभारल्या गेलेल्या एका संपूर्ण घराचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केले. मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे घर बांधले आहे. त्वस्त मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्सने या ६०० चौ.फु. घराची रचना केली आहे. या एकमजली घरात एक बेडरूम, एक हॉल, स्वयंपाकघर अशा सर्व सुविधा उपलब्ध आहे. या घराची रचना याच कंपनीच्या अत्याधुनिक त्रिमितीय छपाई यंत्राच्या सहाय्याने करण्यात आली.
त्रिमितीय छपाईच्या सहाय्याने करायची बांधणी हे वापरायोग्य असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या प्रकारच्या बांधणीत उत्पादनासाठी वाट बघावी लागत नाही. एकूण बांधकामासाठी लागणारा अल्प वेळ आणि खर्च, कार्बन पाऊलखुणांत होणारी मोठी घट, उत्तम उत्पादकता त्याशिवाय पर्यावरणप्रेमी वस्तुपदार्थांचा वापर असे अनेक फायदे या तंत्रज्ञानातून मिळतात.
हे ही वाचा:
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी
ठाकरे सरकारचे माथाडी कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष- नरेंद्र पाटील
या घराच्या बांधकामासाठी त्वस्तने विशिष्ट तऱ्हेच्या काँक्रिटची निर्मिती केली. त्यामुळे हे काँक्रिट वापरून घराचा केवळ त्रिमितीय आराखडा दिल्यानंतर, छपाई यंत्राद्वारे त्या घराच्या आराखड्याबर हुकूम काँक्रिटचा एक एक थर दिला जातो.
यापूर्वी २०१८ मध्ये झी वृत्तवाहिनीने हे तंत्रज्ञान विकासाधीन होते तेव्हा या बाबात माहिती दिली होती. तेव्हाही या कंपनीने काँक्रिटच्या त्रिमितीय छपाईचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी या तंत्रज्ञानाचे कौतूक तर केलेच, शिवाय भारताला अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक इमारत ५ दिवसात बनवली जाऊ शकते. पंतप्रधानांच्या २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर या धोरणामुळे आमच्यासमोर मोठे आव्हान असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळे सर्वांना २०२२ पर्यंत घर देणे तितकेसे आव्हानात्मक राहणार नाही अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.