मणिपूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.मणिपूरमधील मोइरांग विधानसभा क्षेत्रातील थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ शुक्रवारी (१९ एप्रिल) हल्लेखोरांच्या एका गटाने गोळीबार केला.अचानक गोळीबार झाल्याने मतदारांची एकच धावपळ उडाली.दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज पासून सुरुवात झाली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस, सैन्य दल बारकाईने लक्ष ठेवून आहेत.दरम्यान, मणिपूरमधील थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ गोळीबाराची घटना घडली आहे.नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या आणि अचानक काही लोकांच्या एका गटाने अचानक गोळीबार केला.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.यामध्ये गोळीबाराचा आवाज येत असून लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत.गोळीबारमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा:
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला सीआरपीएफ जवान!
‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान यांच्या अटकेचे वृत्त खोटे; चौकशीनंतर दिले सोडून!
प. बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक
एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, काही ठिकाणी अशांततेच्या घटनाही घडल्या आहेत.थोंगजू विधानसभा मतदारसंघात स्थानिक आणि अज्ञात हल्लेखोरांमध्ये हाणामारी झाली.मणिपूरमधील काही भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान झाल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, गोळीबार कोणी केला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.तसेच सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.