दिवाळी सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. दोन वर्षांच्या महामारीनंतर सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जात आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी शहरातील बाजारपेठ फुलल्या असून अनेक शहरांमध्ये फटाक्यांची दुकाने लागली आहेत. यादरम्यानच मुंबईमध्ये पोलिसांनी फटाके विक्रीबाबत महत्वाचा आदेश जारी केला आहे. पोलिसांनी मुंबई शहरातील विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करता येणार नाही.
मुंबई पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी फटाके विक्रीसंदर्भात एक आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, मुंबईत विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांना धोका, अडथळा किंवा नुकसान टाळण्यासाठी मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुणीही फटाक्यांची विक्री करू नये. तसेच ज्या व्यापाऱ्यांकडे फटाक्यांचा परवाना आहे, अशाच व्यापाऱ्यांना फटाके विक्रीची परवानगी असेल, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
Prohibition on selling firecrackers without permission in Mumbai. Actions will be taken against the seller of firecrackers who does not have a license: Mumbai Police pic.twitter.com/t96xUNBrqK
— ANI (@ANI) October 19, 2022
हे ही वाचा:
भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’
बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणारे व्यापारी सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नाहीत. त्यामुळे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सार्वजनिक ठिकाणी आग लागून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विनापरवाना फटाकेविक्रीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. यासोबतचं मुंबई महापालिका हद्दीतील माहुल टर्मिनल, भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम, बीडीयू प्लॉट एरिया, स्पेशल ऑईल रिफायनरी परिसराच्या ५० एकर क्षेत्रात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेला हा आदेश १४ नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे.