अग्निशमन केंद्राचे नरिमन पाईंट येथील कार्यालयाचे प्रमुख उत्कर्ष बोबडे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते केवळ ३८ वर्षांचे होते. त्यामुळेच आता त्यांच्या कुटुंबाने उत्कर्ष यांचा मृत्यू हा कामाची जबाबदारी पार पाडत असताना झाला असे म्हटले आहे. त्यांनी याकरता आता ५० लाखांचा मोबदला मागितलेला आहे. शिवाय, बोबडे यांच्या पत्नीला अग्निशमन विभागात नोकरी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
बोबडे २००६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सामील झाले. सध्या ते नरिमन पॉईंट येथे वरिष्ठ अग्निशमन दल अधिकारी म्हणून तैनात होते. त्यांनी गुरुवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यांनी जिना चढणे, ट्रेड मिल, सायकलिंग, २० किलो वजन लहान आणि मोठ्या पाईपमधून दुसऱ्या बाजूला नेणे असे प्रशिक्षण घेतले. सराव पूर्ण केल्यानंतर, ते घरी आले आणि शांतपणे झोपले. पण झोपेत त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जीव गेला, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
हे ही वाचा:
‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन
पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत
एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण?
उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!
यानंतर आता एकूणच अग्निशमन यंत्रणा आणि तेथील कामाची शैली यावर आता चर्चा होऊ लागलेली आहे. ४८ तास ड्युटी असल्यामुळे अधिकारी फारच तणावात जगत असतात. तसेच या सर्वांचा परीणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही होतो. नियमानुसार ४८ तास काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे. परंतु आणखी काम करून घेतले जाते. त्यामुळेच बोबडे यांचा मृत्यू कर्तव्य बजावताना झालेला आहे. बोबडे यांच्या मृत्यूनंतर अग्निशमन दल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देविदास यांनी त्यांच्या मृत्यू कर्तव्य बजावताना झालेला आहे, अशी मागणी आता केली आहे. बोबडे यांच्या कुटुंबीयांनीही अशीच मागणी केलेली आहे.