26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषराजकोट गेमिंग झोनमध्ये अग्नितांडवात २८ मृत्यू, अग्निशमन विभागाची परवानगी नव्हती

राजकोट गेमिंग झोनमध्ये अग्नितांडवात २८ मृत्यू, अग्निशमन विभागाची परवानगी नव्हती

९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोन येथे शनिवारी लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत नऊ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान आग लागलेल्या झोनला अग्निशमन विभागाची एनओसी नव्हती असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार गेमिंग झोनमध्ये आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता. याशिवाय झोनच्या विविध कप्प्यांमध्ये हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलचा साठा करण्यात आला होता. यामुळे आग झपाट्याने पसरली आणि परिणामी संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यात गेमिंग झोनचे मालक आणि व्यवस्थापक यांचा समावेश आहे. टीआरपी गेम झोनचे व्यवस्थापक नितीन जैन आणि त्याचा मालक युवराज सिंग सोलंकी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा..

आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!

दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!

पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाचा आरोप करत जमावाचा ख्रिश्चनांवर हल्ला!

केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो, मतदानाच्या आकडेवारीत फेरफार अशक्य!

मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत. ओळखीसाठी पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत, असे विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी आगीच्या ठिकाणी जाऊन मदतकार्याची माहिती घेतली. बचाव कार्याची दखल घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

गेमिंग झोनमधील एकमेव एंट्री-एक्झिट पॉइंट सहा-सात फूट उंच होता. ९९ रुपये प्रतिव्यक्ती प्रवेश योजनेमुळे शनिवारी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. शिवाय, पहिल्या मजल्यावरून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. जनरेटरसाठी टीआरपी गेम झोनमध्ये जवळपास २ हजार लिटर डिझेल साठवले गेले होते, तर गो-कार्ट रेसिंगसाठी १ हजार ते १ हजार ५०० लिटर पेट्रोल साठवले गेले होते.

या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय एसआयटीला ७२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक शनिवारी उशिरा राजकोटला पोहोचले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली. एसआयटीचे प्रमुख असलेले अतिरिक्त पोलिस डीजीपी सुभाष त्रिवेदी यांनी ही घटना दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी तत्काळ चौकशी सुरू केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

 

राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्युत कारणांमुळे आग लागली असावी. मात्र, नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. टीआरपी गेम झोनमधील तात्पुरत्या संरचनेत प्रथम मोठी आग लागली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गुजरात डीजीपीने राज्यातील सर्व गेमिंग झोनची तपासणी करून अग्निसुरक्षा परवानगीशिवाय काम करणाऱ्यांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही प्रक्रिया करण्याचे निर्देश डीजीपींनी पोलिसांना दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा