मुंबईतील पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून, आग वीजवण्याचे मोठ्या शर्तीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
गुरुवार, ७ जुलै रोजी सकाळी हिरानंदानी मॉल मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तसेच जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉलमधून निघणारा धूर दुरूनच दिसतो. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.तसेच ह्या आगीचे कारण समजले नसून, ही आग लेव्हल २ ची असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते. सकाळच्या वेळेत मॉलमध्ये बरेच लोक नसल्यामुळे सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हे ही वाचा:
शिवसेनेला खिंडार; ठाण्याचे ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने
नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’
दरम्यान, याधीही हिरानंदानी भागात काही दिवसांपूर्वी डेल्फी बिल्डिंगमध्ये पहाटे भीषण आग लागली होती.सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.