बोरिवली पश्चिमेकडे असलेल्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर शनिवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. या अग्निशमन दलाच्या जवानाला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोरिवली पश्चिमेतील गांजावाला लेन वरील गांजावाला रेसिडेन्स या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असणाऱ्या सुरक्षा कबिनला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. आगीची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली असता घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने इमारत पूर्ण रिकामी करून आगी विझवण्यास सुरुवात केली, ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचा जवान नातू बदक हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले
उत्तर प्रदेशात पुन्हा उमलणार कमळ, काँग्रेस गमावणार पंजाबची सत्ता
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.ही इमारत तळमजला अधिक सात मजली असून सातव्या मजल्यावर सुरक्षा केबिन तयार करण्यात आली होती, त्या कबिन मध्ये ही आग लागली होती, शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.