ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये उपचारासाठी आलेल्या शेकडो रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे बळी गेले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयातले अनेक कर्मचारीही मृत्युमुखी पडले. घटना घडल्यानंतर मृतांच्या परिवाराला मदत दिली जाते. दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं जातं. अशा घटना घडू नयेत यासाठी मात्र काळजी घेतली जात नाही किंवा तशा उपाययोजना देखील केल्या जात नाहीत.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झाला आहे.
आज दुपारच्या सुमारास अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली. घटना घडली तेव्हा १७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सात जण भाजले गेल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा:
कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
विराट सेनेने स्कॉटलंडचा उडवला ८ विकेट्सनी धुव्वा
जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत २० जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत १२ ते १५ जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.