उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी

घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण

उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात भीषण आगीची घटना घडल्याचा प्रकार घडला आहे. महाकाल मंदिरातील भस्म आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली असून यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जगप्रसिद्ध महाकालेश्वरच्या प्रांगणात रविवार, २४ मार्च रोजी संध्याकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली होती. इथे सर्वात आधी संध्याकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी केली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आलं. शिवाय गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप लावण्यात आलेला आहे. होळीला बाबा महाकालला गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. या रंगांनी गर्भगृहाच्या भिंती खराब होऊ नयेत, यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले होते. गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव होत असताना आरतीच्या थाळीत जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे कापूर आगीनं पेट घेतला आणि गर्भगृाहातील फ्लेक्सनी पेट घेतला.

हे ही वाचा:

तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सोमवारी सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागलेल्या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळून निघाले. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. त्याचवेळी आग लागली. सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, गर्भगृहातील आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोणीही गंभीर जखमी नाही. सर्व स्थिर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version