मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी

मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी

मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रूग्णालयाजवळील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास रूग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असून ही आग लेवल तीनची असल्याची माहिती देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत १५ जण जखमी झाले आहेत.

कमला इमारतीमध्ये शनिवारी २२ जानेवारी रोजी सकळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. २० मजल्यांच्या या इमारतीत १८ व्या मजल्यावर आग लागली आहे. १५ जण जखमी असल्याचे वृत्त असून आणखी काही लोक आत अडकल्याची शक्यता आहे. जखमींपैकी १२ किरकोळ जखमी रुग्णांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तीन गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती भाटिया रुग्णालयाच्या डॉ. टीना यांनी दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

हे ही वाचा:

एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन

मोदी का ठरले बेस्ट पीएम?

किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

मॉरिशसच्या मेट्रो स्टेशनला ‘महात्मा गांधीं’ चे नाव

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. आग लागलेली इमारत पूर्णपणे खाली करण्यात आलेली अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या आगीमध्ये १५ जण जखमी असून त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Exit mobile version