बिहारमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात लागली आग!

रुग्णांची पळापळ, अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल

बिहारमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात लागली आग!

बिहारमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात म्हणजेच पाटण्यातील पीएमसीएचमध्ये आग लागली आहे.आपत्कालीन वॉर्डसमोर असलेल्या मेडिसिन स्टोअर रूमला आग लागली आहे.आग लागल्याचे समजताच सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पीएमसीएच रुग्णालयात अचानक आग लागल्याने रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली.घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.स्टोअर रूमची इमारत जेसीबी मशीनने पाडण्यात येत आहे. आगीच्या घटनेमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!

हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!

मिळालेल्या माहितीनुसार,पीएमसीएच रुग्णालयाच्या मेडिसिन स्टोअर रूममध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत.आगीच्या घटनेमुळे पीएमसीएच परिसरातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

 

Exit mobile version