मुंबईतील सांताक्रुज (पूर्व) भागातील गॅलेक्सी हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन जणांचा भाजून मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत.ही घटना दुपारी १ च्या सुमारास हॉटेल मधील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याने घडली.
आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा:
भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा
पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांचा स्फोट; कारखान्याचे छप्पर उडाले, ८ ठार
चंद्रावरील त्या स्थळाला ‘शिवशक्ती’ नाव देण्यात चूक नाही
आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे
सांताक्रुज पूर्वमधील विमल गुप्ता रोडवरील प्रभात कॉलनीतील बीएमसीच्या कार्यालयानजीक हे हॉटेल गॅलेक्सी आहे. माहितीनुसार, दुपारी १ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास हॉटेलच्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली.या आगीत पाच जण भाजले होते. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुपल कनजी (२५), किशन एम (२८), कांतीलाल गोरधन वारा (४८) यांचा मृत्यू झाला. तर अल्फा वखारिया (१९) आणि मंजुळा वखारिया (४९) हे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार रूम नंबर १०३ आणि २०३ मध्ये आग लागली.
या आगीत इलेक्ट्रिक वायर, एसी यंत्रणा, पडदे, फर्निचर जाळून खाक झाले आहे. तिसऱ्या मजल्यावरील वस्तू देखील या आगीत खाक झाल्या.दरम्यान, आग नेमकी कशी लागली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.