31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषअवघ्या ३८व्या वर्षी अग्निशमन दल अधिकाऱ्याचे झाले निधन

अवघ्या ३८व्या वर्षी अग्निशमन दल अधिकाऱ्याचे झाले निधन

Google News Follow

Related

मुंबईमधील अग्निशमन दलाच्या नरीमन पॉइंट येथील प्रमुख अधिकारी उत्कर्ष बोबडे (३८) यांचा गुरुवारी रात्री झोपेतच मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर बोबडे यांचा घरी झोपेतच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने अग्निशमन दलातील त्यांचे सहकारी व कुटुंबीय यांना जबर धक्का बसला आहे.

उत्कर्ष बोबडे हे सन २००६ साली अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते नरीमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रावर प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांनी २० किलो वजन पाठीवर घेऊन श्वसन उपकरणाने सरावही केला. शिडी चढणे, ट्रेड मिल, सायकल चालवणे, छोट्या आणि वाकड्या-तिकड्या पाइपमधून २० किलो वजन घेऊन दुसऱ्या बाजूला जाणे हे अतिशय जोखमीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. सराव पूर्ण करून घरी गेल्यानंतर ते झोपले. त्यानंतर त्यांच्या शरीराची कोणतीच हालचाल होत नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले. मृत्यूचे कारण त्यांचे झोपेतच निधन झाले होते, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी बंद केले महिलांना मंत्रालयाचे दरवाजे

नितीन गडकरींच्या व्हीडिओंना मिळत आहे इतकी रक्कम

…या चित्रपटाला ‘अवकाश’ आहे!

चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?

बोबडे यांचा मृत्यू हा कर्तव्यावर असताना झाला आहे, अशी नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय व काही अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी त्यांचा मृतदेह काही काळ ताब्यात घेण्यास नकार दर्शवला होता. नंतर अग्निशमन दलातील कामगार संघटना हाताळणारे कामगार नेते ऍड. प्रकाश देवदास यांनी, अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सदर मयत अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा