ड्रेनेज टाकीत गाय पडली आणि…

ड्रेनेज टाकीत गाय पडली आणि…

मुंबईतील दादरमध्ये एका ड्रेनेजच्या टाकीत सोमवार, २७ मार्च रोजी सकाळी एक गाय पडल्याची घटना घडली. मुंबईतील दादर भागात असलेल्या कबुतर खाना परिसरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ड्रेनेज टाकीच्या झाकणावर गाय उभी असताना, झाकण सरकून गाय आत पडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दादर भागात शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात आज सकाळी गाय ड्रेनेज टाकीच्या झाकणावर उभी होती. यावेळी अचानक झाकण सरकलं आणि गाय टाकीत पडली. यानंतर याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर गायीला बाहेर काढण्यात यश आले.

 

हे ही वाचा:

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

त्या ‘मातोश्रीं’ना कोटी कोटी प्रणाम!

त्यानंतर ड्रेनेज टाकीच्या आजूबाजूचा भाग खोदून गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान गायीला चारा आणि पाणीही पोहोचवण्यात आले होते. दादरमधील भाग सकाळच्या वेळेस गजबजलेला असतो. गाय टाकीत पडल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती आणि त्याचवेळी जवानही बचावकार्य करत असल्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Exit mobile version