महाकुंभ मेळ्याचा आजचा १८ वा दिवस असून आतापर्यंत करोडो भाविकांनी स्नान केले आहे. लाखो भाविक दररोज मेळ्यात सहभागी होत आहेत. महाकुंभमुळे देशात आनंदाचे वातावरण सुरु असताना परिसरात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. सेक्टर २२ मध्ये ही आग लागली. या दुर्घटनेत १५ तंबू जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलीस अधिकारी प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, कुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा १५ तंबूंना आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. लोकांना सूचना केल्या जात आहेत.
१९ जानेवारी रोजी अशीच आगीची घटना घडली होती. सेक्टर १९ च्या तंबूमध्ये ही आग लागली होती. आगीमुळे अनेक तंबू जळून खाक झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे ही वाचा :
ही ‘तोंड पाटील’की बंद कधी होणार ?
अक्षय कुमारकडून पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर, म्हणाला-‘सल्ला आवडला’
जय भवानी, जय शिवाजी बोलून मते मिळविण्याचे दिवस गेले आता!
ब्रिटन दोन दशकांत मुस्लिम कट्टरतावादाच्या हाती जाण्याची शक्यता
दरम्यान, बुधवारी (२९ जानेवारी) महाकुंभमेळा परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला तर ९० जण जखमी झाले. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रशासन संपूर्ण परिसरावर नजर ठेवून आहे.