नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

Source:ANI

नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडलीय. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. मात्र या आगीत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर काहीजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

वेल ट्रीट हे एकूण तीस बेडचं रुग्णालय आहे. तीन रुग्णांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला होता. २७ रुग्णांना आता रुग्णवाहिकेतून दुसरीकडे उपचारासाठी नेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रुग्णालयातील एसीला लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग लागल्यानंतर काही काळ रुग्णालय परिसरात मोठी अफरातफर माजली.

रुग्णालयातील २७ रुग्णांना अन्य रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता आम्ही काही सांगू शकत नाहीत. पण संपूर्ण रुग्णालयाची पाहणी सुरु असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

देवभूमीत होणार मंदिरमुक्ती

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूपमधल्या एका मॉलमधील रुग्णालायाला भीषण आग लागली होती. त्या आगीत होरपळून दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या परवानगीवरुन जोरदार राजकारणही रंगलं होतं. दरम्यान या मॉलला लागलेली आग तब्बल ११ तासांनी आटोक्यात आणली होती. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.

Exit mobile version