27 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषघाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला आग

घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला आग

Google News Follow

Related

मुंबईतील घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला सोमवारी भीषण आग लागली. घाटकोपर येथील असल्फा सुंदर बाग येथील डिसिलव्हा कपाउंडमधील एका कारखान्याला ही भीषण लागली होती. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही आग लागली त्यानंतर या परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सोमवारी ३ जानेवारी रोजी घाटकोपर परिसरात एका कपड्यांच्या गोदामाला सकाळी अचानक आग लागली. हे गोदाम कपड्याचे असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सकाळी परिसरात धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला याबद्दल कळवले.

हे ही वाचा:

कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले

जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी

फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले

४०० आदिवासींना एकत्र करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न?

या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी झाली आहे. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्यामुळे आग अधिक पसरण्याची चिंता होती. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा