कांदिवलीत इमारतीला आग, दोन महिलांचा मृत्यू

कांदिवलीत इमारतीला आग, दोन महिलांचा मृत्यू

शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी कांदिवलीत एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. कांदिवली मधील हंसा हेरिटेज नावाच्या पंधरा मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली असून या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी एकीकडे अहमदनगर येथील रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच संध्याकाळी मुंबईतील कांदिवली भागातून एका रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली. भाऊबीजेच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास या आगीने पेट घेतला. या आगीचे नेमके कारण समोर आले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तर दुसरीकडे लगेचच बचावकार्यही सुरू झाले. या इमारतीत सात जण अडकले होते. त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर या आगीत होरपळून दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रंजनबेन पारेख आणि नीता पारेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांना कांदिवली इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

याप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रात्री पावणे बाराच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून देण्यात आल्याचे सांगितले. तर आगीचे नेमके कारण समोर आले नसले तरीही शॉर्टसर्किटमुळे किंवा दिवाळीतील फटाक्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम आग पसरू नये यासाठी इमारतीचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे आग जास्त पसरली नाही असेही सांगण्यात येत आहे.

Exit mobile version