कंबोडियातील एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पॉईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी येथील हॉटेल आणि कॅसिनोमध्ये ही घटना घडली.
आग इतकी वेगाने पसरली की अनेकांना यातून बाहेर पडता आले नाही आणि आपला जीव गमवावा लागला. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता हॉटेलमध्ये भीषण आग लागली. हॉटेल ग्रँड डायमंड सिटीमध्ये लागलेल्या या आगीत ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या तेथे बचावकार्य सुरू आहे.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांचा समाचार
अनिल देशमुखांनी ‘मविआ’चीच क्रेडिबिलिटी दाखवली!
८० लाख रुपयांच्या बोगस नोटांसह एकाला अटक
अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर?
या हॉटेलच्या कॅसिनोमध्ये खूप गर्दी झाली होती. या आगीमुळे जवळपास ५० लोक तिथे अडकले होते.आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. त्यामध्ये छताचा मोठा भाग जळाला. हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.
लोकांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली
पोईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी हॉटेलला लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.आग इतकी पसरली होती की लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी जळत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. स्थानिक लोक जवळपास सहा तास आगीच्या ज्वाळांमध्ये घेरले गेले होते.बचाव पथकाने या लोकांना वाचवण्यासाठी मोठी भूमिका बजावली अग्निशमन दलाला ५३ लोकांना वाचवण्यात यश आले.
अखेर आग नियंत्रणात
अग्निशमन दलाने सांगितले की आग जवळजवळ आटोक्यात आली आहे आणि आणखी जीवितहानी टाळण्यासाठी हॉटेलच्या खोल्यांची खबरदारी घेतली जात आहे.